Laknivalo.com

  • Commonly Used
  • Search

Saaki

सोमलाबापू बंजारा साकी

  • Release Date: August 22, 2025
img

सोमलाबापू म्हणजे सारी तांडेरं ढोरं चरायेवाळो मनख्या. कर्राई कर्राई ढोरं चरायेनं वोरं सोबतेनं चपलीयाडीबी जावं. चपलियाडी म्हणजे सोमलाबापूर जळ्ळीं. सोमलाबापू आन् चपलीयाडी म्हणजे तांडेमाहीर समाजदार डोकरा न् डोखरी वेत्ते. सोमलामोट्बापूर दादानं छो छोरा रं. म्हणजे वोरं बापनेनं छो भाई वेतेते. सेती मोटो सोमलारो बाप रामचंद रं. रामचंदेरं छो भाईरं पूरे आठ्ठारं छिजारं वेत्ते. ये से मोट्बापूनं सगे आन् चुलत असे सतरं भाई रं. से भाईवुमं सोमलाबापू सेती मोटो रं. जेती बाकीरं सतरबी भाई वोनं सोमलाभिया केथाळीन बोलं, चपलीयाडीनं भोजाईरे नातेती सेवेन वोरो नाम लेते जावं. छिजाबरं चपलीमोट्याडी आन् सोमलामोट्बापू करनथाळीन बोलं. जण्हं प्रत्यक्ष बोलचाल वं,जण्हं छिजार फक्त मोट्बापू आन्, मोट्याडी करंन बोलतेते.

सोमलाबापू सुमारे साडेपाच फुट ऊचो, मधम सरीरं, गंवुसरीकोसो रंग, म्हणजे न गोरो, आन् न काळो, आसो थोडा सावळोसो रंग. लांभोसो मुंडो, तिकधचं नाक, हमेशा डिलेमं कोपरी रेतीती. डिलेमं कोपरी आन् हेट धोती, माथेपर पिळे रंगेरो कळीरो फटका. तो पगेमं आडंजुने चेप्पलं रेतेते. हातेमं फळंसी कऱ्हाडी आन् माथेआतरीवुच घोळीहुयी सुदसट लकडी. सोमलाबापू पिळी कळीरो फटका, डिलेमं कोपरी आन् हातेम लकडी नतो कऱ्हाडी, नतो कर्राई कर्राई दोईबी हातेमं रेतीती.

सोमलाबापू वयेमं सेती मोटो वेतोतो, पणं सेती नातेती आन परमेती, समजंन बोलतोतो. वोरे मुंडेती सहसा गाळी कोनी निकळतीती. डुंगरेमां ढोर चरावतु चरावतु भजन गावु करं.

वोर ढाळं सामळंन खिंडेम काम करेवाळी एकली आधी बाईबापडीनं भरोभरो लागं. वु मसदं जळ्ळीवुरो जेठ लागं. जेती वो बाईबापडी वोनं “वडारी” केथाळीन बोलतीती. तो बाकीरो बोढीबाळी वोनं बापू करंन केतीती. राखोळीरं पिसा गोळा करेरो, हाट करंन लायेरो. लेळोंदेळों देखेरो. घरेमं सेर बरोबरी करेरो काम डोखरीसामु वेततो. चपलीयाडी दर थावरेरं दनं (हाटेरे दनं) ढोरुरं राखोळी मांगेसारु घरोघर हिंडं. मात्र वोनं राखोळी जल्दी जल्दी वसुल कोनी वेतीती. जेरेकनेती राखोळीरं पिसा टेमेपर मळेनी, जेनं केद की “आंघेरे मिन्हाती तमार ढोरं तमाज समाळो.मारो डोखरा तमारं ढोरं कोनी लेजावळो.” पंण सोमलाबापू कर्राई केर्री ढोरं छोडो कोनी. वु केतोतो, “पिसा आजेरे सवार आवजाह्ये. पंण ढोरुन पेटभरं खायेनं मळं कोनी.” करंन केर्री ढोरं छोडो कोनी.

वु केतोतो, “पिसा आजेरे सवार आवजाह्ये. पंण ढोरुन पेटभरं खायेनं मळं कोनी.” करंन केर्री ढोरं छोडो कोनी. पेण्हा आबे नहीती हातेम पिसा कोनी रेतेते. मजुरी, रोजंदारीरे बदलेमं धान्य मळतोतो. राखोळीमं ज्यारं, बाजरी देतेते. व्येवहारो चलन म्हणजे धान्यंज वेतोतो. आसामी बदलेमबी बलुतेवाळेंन आनाज देतेते.

सोमलाबापूरो ढोरुपरं घणो जीव वेतोतो. वु ढोरुनं आछे आछे खडेम चरायेनं लेजावं. टेमेरटेम पानी परावं. से ढोरुन समाळंन लावं. दनेम जण्हं धेनं आवं जण्हं ढोरं मोजमोजंन देखुकरं. केर्री गावडी जर वेहेनं आवरी विह्ये तो घरेवाळं बापूनं केदं , “बापू, आज गावडीसामु धेनं रेहेदेस. वोरं दनं भराते आवागेछं,” जण्हं बापू वो गावडीसामु आछो धेनं देतोतो.

वेयीहुयी गावडी केल्डानं छोडंन डुंगरेन जायेसारु घंणो कटांळनाकं. तरीबी बापू वोनं लेजावजं. कर्राई कर्राई चार दी दनेरं वेह्यीहुयी गावडीन बछडारो धेनं आवं जण्हं केल्डासारु तिसरेकपोरेती आल्डाआल्डान घरेसामु धासं. जेनबी धोपन लायेरो. से ढोरुन समाळंन लायेरो काम करतु करतु डोखरारं नाकी नऊ आवजावं. तोईबी बापू कर्राई ढोरुती कटांळो कोनी करतोतो. तांडेरे लार्रेरे डुंगरेती ढोरं चरतु चरतु बारेक वाजेनं साबळ्यारी खिंडेम आवजावं. रुंघळीमं धीरेधीरे वेहेवाळे पानीती डिह्या भरावु करं. वोम ढोरं चालतु चालतु पाळीं पिलेनं चरते चरते आंघ भवानीरे खिंडेसामु वाटेन लागजावं. दी वाजेरे टेमेनं ढोरं भवानीवाळी खिंडेम पुचजावं. पानी पिलेनं बेसका मारदं. दुसरे दीचार तांडेरबी ढोरं भळंजावं. वतंज वेहरीकणं बेसनं ढोरुवाळं छिजार दोपेरेरी बाटी खावं.

काही ढोरं बेठे रं, तो कांही वर्रपर्र चरु करं. ढोरुवाळं से छिजारं मळंभळंन मोहीडंडा रमु करं. रमतीरो डावं, घंटा घंटा चालु करं. रमतीमं खूबंज मजा करं. बादेमं पांगेहुये आपंळ आपंळ ढोरं गोळा करंन होटो फेरलं. ढोरं चरते चरते आवु करं. छिजार भजंन लेवु करं. कोही रमु करं. केर्री धिंगा मस्ती चालु करं.

एक दनेर वात छं. रोजेनई बापू ढोर डुंगरेन लगादिनो. साबळ्याती भवानीरं खिंडेम पुचगे. वतेती होटोबी फरगे. साबळ्यारे वाटेनं होटो घरं आवगे. पंण हामारं मोरी गावडी डुंगरेमं भुलाडी पडंन रेघी कं, दुसरे तांडेरे ढोरुमं चलेगी. क कती हारो हारो चारो खायेसारु किचडेमं आंघ आंघ जातु जातु फसगी क कांई ? ये बदलेमं बापूंन कांहीज मालम कोनी वेत्तो. पंण वु कं की, गावडी घरेलगु आवगीछं.

आत्तंज येवडीवोवडी देखो. जु दाढो आथमेरी वाटेनं लागछं. जु गावडीनं केल्डारो धेनं आवछं. वोरे पिल्लासारु डुंगरे कनेती आल्डावती धासती आयेवाळं गावडी आज घरं कोनी आयी. जेती सेज घोरेम पडगेते. बारक्यासे केल्डान खूब भूक लागरीती. जेनं देखदेखनं याडीनं रोवळीं आवरीती. हामनेनबी गावडीरो घंणो धेनं आवरोतो. आब केल्डानं कांई पराह्या. जेरो घोर पडगोतो. मनं तो रेनंरेनं गावडी घंणोज धेन आवरीती. मारे नंजरेमुंढागेती मोरी गावडी चेहरा जारोती कोनी. मारो बा आन् काका तांडेरे चारीवडी, डुंगरे सामुरी पांधीन, लार्रेरे खोळीसामु, केर्री मालेमं चलेगी छं की कांई? करंन खेतारीसामुबी देखंन आवगे ते. जेवणवेळं वेथाळीण टळगीती. घंटा घंटाती रात बढती जारीती. सारी सीमारेमं, डुंगरेसामुबी धुंडंन आवगे. पंण मोरी गावडीरो पत्तोज लागो कोनी.

या केल्डानं घंवुरो आट्टो घोळंन परायी. जेती केल्डारं भूक थोडी शांत वेगीती. पंण वोनं वोरी याडीरं धेनः आवं, जेती रैरैथाळीन ऱ्हामरोतो. केल्डा घणोज तगमग कररोतो. जेनं देखंन मारो कळजो फाटतो जारोतो. हानु करेकरेमं आध रात वेगीती. घोर करकरंन कोईबी समाधानेती बाटी खादे कोनी. आतराम बा केहेलागो, “आब सेवेनं सोजावो, परभाती मोरीरं धुंडीह्या.”

मारं याडी केल्डारं डिलेपरेनं हात फेरंन वोरो डिल खजारीती. वोनं थंडी न लागळुं करंन वोरे डिलेपर कपडा ढाकरीती. या सोतारे छोरान छोडंन, गावडीरे केल्डारं वेवस्था करेमं परेशान वेरीती. सेवेनं सोगेते. केर्री आॕखी लाग्गीती, तो केर्री कोनी लागीती. मारे मनेमं केल्डार तडफड दखारीती. जण्हं मारे धेनेम आयो. जरं खरोज मोरी लाभी कोनी, तो ये केल्डारं काई वेल्हा वेजाह्ये. बिचारी याडीरे प्रेमेनं पारखो वेजाह्ये.

येमं ये केल्डारो कांहीज दोष न रेहता, बिचारेनं भोगळुं लागीह्ये. वोनं याडीरो प्रेम कोनी मळं कांई आब. हानु विचार करतुकरतु, मारं बी आॕखी लाग्गीती. आॕध रात वेथाळीनं ढळगी विह्ये. बिचारे केल्डानं मोरी याडीरो धेनं आवरोतो. याडीरो धेनं करंन रोरोतो. रोवतु रोवतुज सोगो.

मोट्टी पाहेटेरं टेम विह्ये. डुंगरेसामुरं पांधीनं गावडी धप पडरे जु सामळु आयो. मोरी जोरजोरेती धासती आवरीती. वोरो वोढो दूदेती तुंबारोतो. वोरो पान्हा वोनं आवरतु कोनी आवरोतो. बिचारी मोरी वोरे बेटानं परायेसारु धाटीधाटी आवरीती. मोरी जसो दामळीमं आयी वसोज, केल्डासारु जोरेन आल्डायी. जण्हं वोरो केल्डा जागी वेगो. वो केल्डारे डिलेम, तुफान ताकद आवगी. केल्डा गावडीरो आवाज सामळों, जसीज वोनं बळ आवगो.

गावडीरं ढाळं सामळंन जसो जोरेती झटको मारंन धाटो. वसोज वोरो गाळा तुटगोतो. जेनं देखंण याडी केरीती. आवडाके केल्डामं आतरी ताकद, कतेती आन् कसो कांई आवगी विह्ये? इ छं, याडीरे प्रेमेरी ताकदं. याडीरे प्रेमेनं पारखो वेयोहुयो केल्डा. याडीरं ढाळं सामळंन गाळा तोडंलंछं. येनंज याडीरं प्रेमेरं ताकद केहतु आह्ये. मोरी केल्डान चाटचाटंन परारीती. मोरी शांत हुबीती. वोढो तुंबारोतो. एकडीती केल्डा पिरोतो. दुसरीवडीती बा दूद काडरोतो. केल्डान् गावडीरं भेटीरो आनंदेरो परसंग सारी घर देखरेतो.

मोरी आवगी. ई वात सेनं कानेती कान मालम वेगी. परभाती सोमलाबापू आन् चपलीयाडी दोईवेनं आथाळीनं मोरी गावडीरं पुजा कररेते. आतराम दुसरे तांडेरो धनसंग्या आयो. वु सोमलाबापूनं केलागो. आबं तारेती ढोरं समाळेरो वेयेनी.

तू आब हाई काम छोडं द. ई गावडी कालेनं दीतीन वळां मारे मालेमं आवगी. वतं ढोर चरायेवाळं कोहीज कोनी वेतेते. जण्हं वतंज बळदुरं साकळीती गावडीन भांददिनोतो. वोनं चारो घालदिनो. बादेम म मारे कामेन लाग्गो. सांज ये गावडीनं छोडेरो भुलागो. आज पाहेटेनं धेनेमं आयो. जण्हं जान देखरोछु. तो वतं गावडी छेनी. वोन जे साकळीती भांदोतो. वु साकळी तुटमेलीछ. आधं तुटीहुयी साकळी आबंबी मोरीरे गळेमं लटकरीती. जे साकळी तोडंन मोरी केल्डावासू आवगी. तुटीहुयी साकळी देखन, याडीरो बेटीबेटापरं अथवा मोरीरो केल्डापर कतरा जीव रछं, येरं बदलेम चर्चा करते बेठेते. आजुबाजुरं से लोक मोरीनं देखेसारु जमगेते.

कथालेखणः तात्याराव चव्हाण (कचनेरकर)

img